काका यादव, भवानीनगर
मागील आठवड्यात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सलग तीन दिवस पाऊस पडत असतानाच निरा डावा कालवा अनेक ठिकाणी उचंबळून वाहिला. जलसंपदा खात्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेळेचं वितरिका सोडल्या नाहीत त्यामुळे उचंबळून वाहणारा निर्णावा कालवा अनेक ठिकाणी फुटला. कोट्यावधींचे नुकसान झाले. मग जलसंपदाचे अधिकारी जागे झाले. पण अजूनही उदासीनता कायम आहे.
ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कालवा फुटला त्या पिंपळी मासाळवाडी सनसर आदी भागांमध्ये पाटबंधारे खात्याने कामे सुरू केले आहेत परंतु पाटबंधारे खात्याचे कार्यालय ज्या ठिकाणी आहे त्या संसदेतील इरिगेशन कॉलनी या ठिकाणीच कालव्याच्या भराव्यात मोठे भगदाड पडले आहे. आतील बाजूने पूर्ण माती खचली असून भविष्यात या ठिकाणी देखील कालवा फुटू शकतो.
सणसरच्या पाटबंधारे वसाहतीच्या शेजारी असलेल्या श्री दत्त मंदिराच्या पाठीमागील बाजूस हा प्रकार घडला असून येथून अवघ्या काही फुटावरच सणसरचे जलसंपदा विभागाचे कार्यालय आहे. मात्र या ठिकाणी अजून पाटबंधारे विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पाहणी केलेली नाही हे विशेष. काखेला कळसा आणि गावाला वळसा अशी काहीशी स्थिती या ठिकाणची असून या ठिकाणचे हे पडलेले भगदाड तातडीने बुजवावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका उपप्रमुख विजय शिरसट, शाखाप्रमुख अक्षय जगताप माजी ग्रामपंचायत सदस्य अक्षय काटकर, दत्तात्रय भालेकर, पप्पू जगताप, बबलू निंबाळकर, प्रविण ननवरे आदींनी ही मागणी केली असून या ठिकाणी कालवा फुटल्यास पाणी थेट लोक वस्तीत घुसू शकते आणि मोठे नुकसान होऊ शकते अशा स्वरूपाचा इशारा दिला आहे.











