हॉर्नबील अर्थात धनेश पक्ष्याला मडबाथ ( चिखलातील आंघोळ) करताना पाहणं म्हणजे तसा दैवदुर्लभ क्षण…बारामतीकर उद्योजक व हौशी छायाचित्रकार मिलींद शहा यांनी हा क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात चित्रबध्द केला. मात्र त्यासाठी त्यांना चक्क तीन तास प्रतिक्षा करावी लागली. दांडेलीच्या परिसरात चित्रबध्द केलेला हा व्हिडीओ पक्षीप्रेमींसाठी पर्वणीच ठरावा असा आहे. मिलींद शहा यांना अशा वेगळ्या प्रकारच्या छायाचित्रणाचा छंद आहे. त्यांची अनेक छायाचित्रे वेगवेगळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या प्रदर्शन, जर्नलमध्ये गौरवली गेली आहेत. महान्यूजच्या दर्शकांसाठी मिलींद शहा यांनी काढलेला हा व्हिडीओ खास…










