बारामती: महान्यूज लाईव्ह
आज सकाळी नव्याने आलेल्या अहवालात 24 रुग्णांची भर पडल्याने बारामती पुन्हा एकदा आज देखील शतकाच्या जवळ पोहोचली. आजी बारामतीत 90 रुग्णांची भर पडलेली आहे अवघ्या चार दिवसात जवळपास 400 रुग्णांची भर पडल्याने यापुढील काळात हाच ट्रेण्ड कायम राहिला तर रुग्णांची व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान नगरपालिका प्रशासन व आरोग्य यंत्रणेवर राहणार आहे
144 नमुन्यांच्या अहवालानंतर सकाळी उशिरा आलेल्या 220 कोरणा संशयितांच्या नमुन्यामध्ये नव्याने चोवीस रुग्ण आढळले असून यामध्ये कसबा येथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.
कसबा येथे दहा रुग्ण आढळले असून यामध्ये जय प्लाझा येथे 12 वर्षीय युवक व कसबा येथे 40 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, पंधरा वर्षीय युवक, 21 वर्षीय महिला, वीस वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, दोन वर्षीय मुलगा, 40 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय युवकाचा समावेश आहे.
मोरगाव रोड येथे 21 वर्षीय पुरुष, गणेश नगर येथे चाळीस वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथे 28 वर्षीय पुरुष, विठ्ठलनगर येथे 60 वर्षीय महिला, बाबानगर रुई येथे 41 वर्षीय पुरुष, मार्केट यार्ड येथे सात वर्षीय मुलगी, तांदुळवाडी येथे 20 वर्षे पुरुष, सूर्यनगरी येथे 70 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय रुग्णाचा समावेश आहे.
हरिकृपा नगर येथे 63 वर्षीय पुरुष, मार्केट यार्ड येथे 26 वर्षीय महिला, 17 वर्षीय पुरुष व तीस वर्षीय पुरुष रुग्ण आढळले आहेत.










