• Contact us
  • About us
Sunday, October 18, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बेकरी व्यवसायातलं ऐश्वर्य…

Maha News Live by Maha News Live
February 1, 2020
in शेती शिवार, राज्य, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बेकरी व्यवसायातलं ऐश्वर्य…

राज्यातील काही जिल्ह्यांत आज ऐश्वर्या बेकरीचे नाव वाचले की, ग्राहक डोळे झाकून त्या फ्रॅंचाईजीच्या आऊटलेटमध्ये जाऊन खरेदी करतात.. ऐश्वर्या बेकरी व औद्योगिक केटरींगसाठी असलेले ऐश्वर्या अलाईड फूडस हे नाव आता उद्योग क्षेत्रात चांगलेच परिचित झाले आहे..मात्र या प्रवासाची कहाणी फारच लक्षवेधक अशी आहे. या व्यवसायात ऐश्वर्य निर्माण करणाऱ्या या ब्रॅण्डचा मालक मात्र आजही पडद्याआडच राहतो.
होय महेश साळुंखे हे नाव बारामतीकरांसह आसपासच्या भागात परिचित असले तरी त्यांची कहाणी मात्र अशीच शून्याला विश्वात नेणारी आहे. महेश साळुंखे यांचे वडील मापाडी काम करायचे. मात्र आपण हे काम करीत असू, तरी देखील आपल्या मुलाने मोठी स्वप्ने पाहावीत हा त्यांचा आग्रह व कटाक्ष कायम होता. चुलत्यांचे यामध्ये सदैव लक्ष असायचे. त्यातूनच शिकून काहीतरी व्यवसायच करायचा हे स्वप्न महेश यांनी लहानपणी पाहिले. मग पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर बारामतीच्या विद्यानगरीच्या चौकातले एक निरिक्षण त्यांनी जाणले आणि गरज किंवा व्यवसायाचा पहिला टप्पा म्हणून त्यांनी या चौकात रसवंतीगृह सुरू केले. चौकसबुध्दी व काळाच्या पुढचा विचार करण्याचा दूरदृष्टीचा भाग म्हणून त्यांनी या रसवंतीगृहात काम करतानाच ओळखले की, येथे विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढते आहे, त्या विद्यार्थ्यांना सकाळी खाण्यासाठी किंवा वेगळे काहीतरी आवश्यक आहे, त्यातूनच त्यांनी सन 2004 मध्ये बेकरीची सुरवात करायचे ठरवले. जोडीला येथील औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचीही अपेक्षा जाणून घेतली आणि सन 2004 मध्ये ऐश्वर्या बेकरी जन्माला आली, हे जन्मलेले बाळ पुढे नामांकित ब्रॅण्डपर्यंत व कोट्यवधींच्या उलाढालीपर्यंत पोचले, मात्र ते पोचविण्याची कामगिरी मात्र अफलातून अशीच राहीली.
सुरवातीला १० बाय १० च्या खोलीत दोन कामगारांसमवेत ऐश्वर्या बेकरी सुरू झाली. व्यवसाय करायचा तर पहिल्यांदा पैसे असा प्रश्न समोर येतो. तसा तो महेश यांच्याही समोर आला. कर्ज कोणी देत नव्हते. वडीलोपार्जीत दोन एकर शेती होती, ती बारामती बॅंकेकडे गहाण ठेवून साडेतीन लाख रुपये कर्ज घेतले आणि त्यातून हा व्यवसाय सुरू झाला. मात्र जसजशी वेळेत परतफेड झाली, तसतसे कर्ज मिळत गेले, थोडक्यात परतफेड करण्याची वृत्ती चांगली असेल, तसा अनुभव बॅंकेला आला, तर बॅंक निश्चित पाठीशी उभी राहू शकते. महेश यांना हा अनुभव आला. बेकरीचा प्रवास सुरूच राहीला.
महेश मात्र सतत नाविण्याचा शोध घ्यायचे. त्यांचे स्वच्छतेवर प्रेम व बारकावा असल्यामुळे बेकरीचे पदार्थ लवकरच नावारुपाला आले. बेकरीबद्दलचे सारे गैरसमज मोडीत काढताना हायजिनीक उत्पादने, एफडीआय प्रमाणित रंगांचा वापर व तब्बल १०० अधिक पदार्थ ही वैशिष्ठ्ये कायम ठेवली. आज ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळात तब्बल १५ कोटी खर्चून उभारलेल्या अत्याधुनिक यंत्रणेसह ऐश्वर्या बेकरी नव्हे तर उद्योग सुरू आहे. जवळपास ४०० कामगारांना नोकरी देणाऱ्या या बेकरीची उलाढाल ८ कोटींची आहे.
आज पुण्यासह विविध भागांमध्ये ऐश्वर्याच्या १२ शाखा आहेत आणि त्यांचा नावलौकिकही झपाट्याने वाढतो आहे. महेश यांच्या उत्पादनांना राज्याच्या विविध जिल्ह्यांतून मागणी असल्याने आता ५० शाखांमध्ये विस्तार करायचा आहे.
एवढ्यावरच न थांबता महेश यांनी औद्योगिक कंपन्यांसाठी औद्योगिक केटरींग सुरू केले, त्यांच्या अत्युच्च दर्जावर विश्वास ठेवत बारामती औद्योगिक वसाहतीतील ९ कंपन्यांनी त्यांना कंत्राट दिले. आज दररोज ७ हजार कामगारांना त्यांच्या ऐश्वर्या अलाईड फूडस मधून आहार वेळेत पोचतो. २४ तास सुरू व कायम दक्ष असलेल्या या फूडस उद्योगात २४० कामगार काम करतात.सेंट्रलाईज्ड किचन ही संकल्पना महेश यांनी यशस्वी करून दाखवली. अर्थात कामगारांना पूर्ण स्वातंत्र्य, भक्कम पाठबळ व विश्वासाबरोबर कुटुंबियांचा पूर्ण पाठींबा यामुळे महेश यांची घौडदौड सध्या वेगात सुरू आहे. याच्या जोडीला त्यांची पुण्यातही एमीनंत बेकिंग कंपनी आहे. ही मॉडर्न कॉन्स्पेक्ट वरती चालणारी एक वेगळी बेकरी आहे, त्याच्या 7 शाखा चालू केल्या असून त्याचाही विस्तार चालू आहे.बेकरी व्यवसायातील हे ऐश्वर्य उभारताना कोणत्याही संकटांना न हारता त्यांना संधी मानणाऱ्या महेश यांचा आजवरचा प्रवास अनुकरणीय असाच आहे.

मित्रांनो, ग्राहकाच्या अपेक्षा व गरजांचा अभ्यास करा…!
`मी गेली 17 वर्षे बेकरी व्यवसायात आहे, कोणताही पिढीजात धंदा नसताना या व्यवसायात यशस्वी होण्यामागे शालेय दशेतच सचोटी, चिकाटी, जिद्द आणि स्वच्छता यांचा कटाक्षाने मी वापर केला. त्याचा फायदा झाला. नव्या पिढीला, ज्यांना अशा व्यवसायात उतरायचे आहे, म्हणजे ज्यांना अन्न व प्रक्रिया क्षेत्रात उतरायचे आहे, त्यांच्यासाठी संधी अनंत आहेत, फक्त तुमची नजर फार तीक्ष्ण पाहिजे, काळाला शोधण्याची व काळाच्या पुढे दोन पावले पुढचे तंत्रज्ञान व पदार्थ तुम्हाला बाजारात आणता आले पाहिजेत. तुमचा अभ्यास तर असलाच पाहिजे. मी स्वतः पुण्यात बेकरीत राहून काम केले. त्यामुळे त्यातील बारकावे लक्षात आले. कोणताही व्यवसाय सुरू करताना स्वतः त्याचा बारकाईने अभ्यास व खालच्या स्तरापासून काम करण्याचा अनुभव घेतला तर त्यात यशस्वी होणे काही अवघड नाही.“ – महेश साळुंखे.

Next Post

सहकारात घुसवलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीने केला जय श्रीराम...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group