बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत आज दिवसभरात २१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये बारामती शहरातील १६ आणि ग्रामीण भागातील ५ रुग्णांचा समावेश आहे.
काल बारामती मध्ये एकूण ११५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील १०२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर बारामती शहरातील अकरा आणि ग्रामीण भागातील दोन अशा तेराजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच आज दिवसभरात २४ जणांची एंटीजेन तपासणी करण्यात आली. त्यातील बारामती शहरातील पांच आणि ग्रामीण भागातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे.
त्यामुळे आज दिवसभरात बारामती शहरातील १६ आणि ग्रामीण भागातील ५ असे २१ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. तर बारामतीची रुग्णसंख्या आता ५४१ वर गेली आहे.










