विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
शिवाजी करडे लिखित / दिग्दर्शित व बारामतीच्या निलेश धुमाळ यांची निर्मिती असलेला भट्टी ह्या लघुपटाची निवड भारतातील खुप मोठ्या नामांकित आशा ” केरळ डॉक्यूमेंट्री व शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2022″ मध्ये वर्ल्ड कॉम्पेटेशन सेक्शन मध्ये निवड झालेली आहे.
जगभरातून आलेल्या सर्व फिल्म्सपैकी 28 फिल्म्स ची निवड करण्यात आली आहे. हा फेस्टिवल 26 ते 31 ऑगस्ट या दरम्यान तिरुअनंतपुरम , केरळ येथे भरणार आहे. हा लघुपट एका सत्य घटनेवर आधारित असून विट भट्टी कामगारांच्या जगण्याच्या संघर्षा वर भाष्य करणारा आहे. भांडवलदार यांचा कामगारांच्या प्रति असलेला द्वेष, क्रूरता, व अमानवी वागणूक याचे भयानक वास्तव दाखवण्याचा प्रयत्न या लघुपटातून केलेला आहे.
या लघुपटाचे चित्रीकरण बार्शी येथे झालेले असून, वर्षा मालवणकर, शरद जाधव, राम गोविंदवाड, मलशीद्ध देशमुख यांनी प्रमुख भूमिका साकारल्या असून मंगेश आरोटे, अपूर्वा कदम, किशोर गायकवाड,काकासाहेब शिंदे यांनी सहाय्यक भूमिकेचे काम पार पाडले.
आनंद मनसुक यांनी छायाचित्रण केले असून संकलन प्रतीक पाटील यांनी केले आहे. तसेच वेशभूषा- आकाश बनसोडे, कला दिग्दर्शन- अतुल लोखंडे , रंगभूषा – विठ्ठल सोनवणे , संगीत – अमित पाटील, ध्वनी मुद्रण – आकाश छाया लक्ष्मण, ध्वनी संकलन – अमित पाटील,
कलर – प्रतीक सारजोशी, कला सहाय्यक – शाम सर्वगोड, निर्मिती व्यवस्थापन – महेश क्षीरसागर , परमेश्वर भोंडवे, तर गणेश डुकरे, विक्रम बोळेगावे, किशोर गायकवाड, लखन चौधरी, सुधाकर शिंदे यांनी सहाय्यक दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे.