राजवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर महाविद्यालयात वाटपास प्रारंभ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री व तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक हजार एक बेलाच्या रोपाचे वाटप करण्यात येणार आहे, त्याची सुरवात निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी इंदापूर महाविद्यालयात केली.
निसर्ग पर्यावरण आणि आरोग्याचे संतुलन याचा विचार करून बेलाच्या रोपाची निवड करण्यात आल्याचे राजवर्धन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. महाविद्यालयातील कार्यक्रमात त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना बेलाच्या रोपाचे वाटप करुन प्रारंभ केला.
प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी बेल हे देशी वृक्ष असून भारतीय परंपरेत बेलास महत्त्व आहे.आयुर्वेदात त्याचे महत्त्व सांगितल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी डॉ. शिवाजी वीर, डॉ. भिमाजी भोर, डॉ. सदाशिव उंबरदंड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी केले. आभार उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी मानले.










