इंदापूर : महान्यूज लाईव्ह
आज इंदापूर तालुक्यात नव्याने कोरोनाचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. सकाळी बारामतीतील तपासणीत आढळलेल्या दोन रुग्णांमुळे इंदापूर तालुक्याची कोरोनाग्रस्तांची आजची संख्या दहावर पोचली आहे.
आज कोरोना संशयितांच्या झालेल्या आरटीपीसीआर व रॅपिड अॅंटिजेन तपासण्यांमध्ये हे आठ जण आढळून आले आहेत. यामध्ये गलांडवाडी नंबर १ मधील ५० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश असून भिगवण स्टेशन येथील जुन्या कोरोनाग्रस्ताच्या निकटच्या संपर्कातील नातेवाईकांपैकी ४० वर्षीय महिला, १८ वर्षीय युवती, ६५ वर्षीय पुरूष रुग्णाला कोरोनाची बाधा झाली आहे.
रॅपीड अॅंटिजेन तपासणीत इंदापूर शहरातील राजवलीनगर येथील ७२ वर्षीय पुरूष, येथीलच ३४ वर्षीय महिला, सुरवड येथील एकाच कुटुंबातील ३५ वर्षीय पुरूष व ३४ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. काल रात्री बारामतीतील तपासणीच्या अहवालात अकोले, धायगुडेवस्ती येथील एकास कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते.











