दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना बाधीत गावात आज १५ जणांचा कोरोना तपासणी अहवाल हा पाँझिटिव्ह आला आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी ही माहिती दिली. मंगळवारी ( ता. १८ ) कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील ७४ जणांची कोरोना विषाणू ची तपासणी यवत व स्वामी चिंचोली येथील कोवीड सेंटर येथे करण्यात आली. ७४ पैकी १५ जणांचा अहवाल हा पाँझिटिव्ह आला आहे तर उर्वरित ५९ जणांचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. दौंड तालुक्यातील वाळकी येथे पाच, खडकी येथे तीन, पाटस दोन, यवत दोन, लडकतवाडी एक, चौफुला एक, देऊळगाव गाडा एक असे एकूण १५ जण १७ ते ६० वयोगटातील १२ पुरुष व ३ महिला यांचा समावेश आहे, दरम्यान काल शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात तब्बल ७० जण कोरोना बाधीत सापडले होते, आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात १५ जण कोरोना बाधीत सापडले आहेत, शहरातील कोवीड सेंटर चा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.











