दौंड : महान्यूज लाईव्ह
गणेशोत्सव समोर आला असतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दौंड पोलिसांनी 14 गुंडांना तडीपारीची नोटीस बजावली आहे दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी ही माहिती दिली
दौंड शहरातील दोन पेक्षा अधिक मारामारीचे गुन्हे असलेले, जबरी चोरी, विनयभंग यासारखे गुन्हे त्याचप्रमाणे अवैध दारू विक्री करून अशांतता माजवणारे अशा चौदा जणांची तडीपारी करण्याचे प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले होते. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार या 14 जणांना तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. हे 14 जण दौंड तालुक्यात कोणत्याही गावात आढळल्यास त्यांना थेट तुरुंगात टाकले जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.










