बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील काल घेतलेल्या 89 नमुन्यांपैकी 84 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून पाच जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत, प्राप्त झालेल्या अहवालांपैकी 81 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून शहरातील बारामती शहरातील टी सी कॉलेज जवळील एक रुग्ण, उर्जा भवन येथील एक रुग्ण व कसबा बारामती येथील एक रुग्ण अशा तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत
तसेच काल तपासणीसाठी 135 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत त्यापैकी 26 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित 109 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
काल दिवसभरात बारामती मध्ये खाजगी प्रयोगशाळेत एकूण 63 नमुने एॅंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी बारामती शहरातील 14 व ग्रामीण भागातील तीन असे एकूण 17 रुग्ण एंटीजेन पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामुळे काल रात्री पर्यंत बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 458 झालेली आहे. बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेत काल केलेल्या तपासणी नमुन्यांपैकी बारामती तालुक्यातील जे कोरोना बाधित आढळले असून यामध्ये कसबा भागातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. यामध्ये 2 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाची मुलगी 7 वर्षाची मुलगी, 57 वर्षीय पुरुष व 32 वर्षीय महिलेचा समावेश आहे, तर आमराई येथील 39 वर्षीय महिला, सहयोग सोसायटी येथील दत्त कृपा बिल्डींग मधील 30 वर्षीय पुरुष, जामदार रोड कसबा येथील 48 वर्षीय पुरुष, कसबा येथील निर्मिती हिल्स येथील 50 वर्षीय महिला, पानगल्ली बारामतीतील 34 वर्षीय पुरुष, वणवे मळा येथील 40 वर्षीय महिला, माळेगाव येथील 48 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील 37 वर्षीय पुरुष, पाटस रोड येथील 27 वर्षीय पुरुष, याखेरीज इंदापूर तालुक्यातील अकोले येथील 27 वर्षीय पुरुषास देखील कोरोनाची लागण झाल्याचे येथे आढळून आले आहे.










