दौंड: महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील राहू येथील एका खाजगी डॉक्टरांसह त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याचा खासगी रुग्णालयातील अहवाल प्राप्त झाला आहे, अशी माहिती तालुका अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.
दौंड तालुक्यात सध्या शासकीय कोवीड सेंटर मधील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या कमी होत असली तरी खासगी रुग्णालयातील कोरोना विषाणू तपासणी अहवाल पाँझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहेत. राहू येथील एका डॉक्टरांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या कुटुंबातील त्यांचे वडील, आई, पत्नी व लहान मुलगी देखील कोरोना बाधित झाली आहे.
संबंधित डॉक्टरांनी खासगी रुग्णालयात तपासणी केली असता कुटुंबातील व्यक्तीही कोरोना पाँझिटिव्ह असल्याचा खासगी अहवाल आला आहे. दरम्यान, तालुक्यातील पाटस येथील डॉक्टर दांपत्य व केडगाव येथील डॉक्टर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.










