दौंड : महान्यूज लाईव्ह
भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी दौंडच्या कांचन राहुल कुल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर पुणे भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी मुळशी येथील किरण दत्तात्रय दगडे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.त्याच बरोबर भाजपच्या सर्व जिल्हास्तरीय कार्यकारणची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी दिली.
जिल्हा व तालुका पातळीवर नुतन कार्यकरणाची निवड आज भाजपचे विद्यमान खासदार गिरीश बापट,माजी मंत्री बाळा भेगडे, दौडचे आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, माजी आमदार शरद ढमाले, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष जालींदर कामठे,जिल्हा प्रभारी योगेश गोगावले, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,रवी अनासुपरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजपने अधिकृत उमेदवारी देवून राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कडवी टक्कर देणाऱ्या कांचन राहुल कुल यांची भाजपच्या महिला आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी मुळशी येथील किरण दगडे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
नव्याने झालेल्या निवडी पुढीलप्रमाणे : युवा मोर्चा : जिल्हाध्यक्ष : किरण दत्तात्रय दगडे पाटील (मुळशी) , संघटन सरचिटणीस : संदीप सातव, सरचिटणीस श्रीकांत उध्दव ताम्हाणे (पुरंदर ), जीवन युवराज साखरे (मुळशी)
महिला आघाडी : जिल्हाध्यक्ष : कांचन राहुल कुल (दौंड), सरचिटणीस : ऋतुजा धैर्यशील जाधव (पुरंदर), श्रिया सचिन रहाळकर (लोणावळा)










