दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील गोरगरीब जनतेची कोरोना या महाभंयकर रोगाच्या पार्श्वभुमीवर झालेल्या मागील चार महिन्यापासून लॅाकडाऊन मुळे प्रचंड हाल झाले आहे. यातच महावितरण कंपनीकडून घरगुती विज बिले भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. शासनाने घरगुती विजे माफ करावी व विज बिले भरण्यासाठी तगादा लावू नये या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट ) यांच्या वतीने यवत येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले.
दौंड रिपब्लिकन पक्षाचे तालुका उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी यवत येथील महावितरण कंपनीच्या कार्यालया समोर मोर्चा काढण्यात आला. महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षा नागरबाई शिंदे,आविनाश चव्हाण, रमेश वालझाडे, सुशिला लोंढे,शिला पवळ,मुक्ता पवार आदी यावेळी उपस्थित होते.










