मुंबई : महान्यूज लाईव्ह
आजपासून म्हणजे १ जुलैपासून विविध कर नियम, शेअर बाजार आणि कामगार कायद्यांशी संबंधित बदल लागू होणार आहेत. काय असतील हे बदल? जाणून घेऊयात.
क्रिप्टोकरन्सीवर टीडीएस कापण्याबाबत केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु होणार आहे. व्हर्च्युअल असेटसाठी रु.१०००० पेक्षा जास्त रकमेवर १ टक्का टीडीएस कापला जाणार आहे. १ एप्रिलपासून या व्यवहारांवर ३० टक्के प्रात्पीकरासह सेस आणि सरचार्ज लागू झाला आहे. आता सीबीडीटीने एक परिपत्रक जारी करून टीडीएस कसा कापला जाईल यासंदर्भात माहिती दिली आहे. यानूसार खरेदीदार आणि क्रिप्टो एक्स्चेंज या दोघांनाही टीडीएस कापावा लागेल.
जर तुम्ही आतापर्यंत पॅनशी आधार कार्ड लिंक केले नसेल तर आता तुम्हाला त्यासाठी १००० रुपये शुल्क द्यावे लागेल. ३१ मार्च २०२३ पर्यंतच पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करण्याची मुदत आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड पॅन कार्डाशी लिंक करून घ्या.
केंद्र सरकारने नवीन कामगार कायदा लागू करण्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतू १ जुलैपासून नवीन कामगार कायदा लागू होण्याची शक्यता आहे. खरोखरच आजपासून या कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली तर अनेक बदल होऊ शकतात. या कायद्यानूसार आठवड्यातील कामाचे दिवस ५ ऐवजी ४ होऊ शकतात. पण त्याचवेळी कामाचे तास वाढतील. ९ तासाच्या शिफ्टऐवजी कर्मचारी १२ तासांच्या शिफ्ट करतील. आठवड्यातून ४८ तास कामगारांना काम करावे लागेल. याखेरीज या कायद्यात पीएफ आणि अर्न लिव्ह पॉलिसीसारख्या अनेक तरतुदी आहेत.
या सगळ्याची सुरुवात आजपासून होण्याची शक्यता आहे.