महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती ची मागणी
सुरेश मिसाळ, महान्यूज लाईव्ह
इंदापूर : राज्यातील 2005 पूर्वी नियुक्त असणा-या सर्व शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या इंदापूर शाखेच्या वतीने करण्यात आली राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे या मागणीचे निवेदन देण्यात आले. भरणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना याबाबत विनंती केली आहे.
पुणे विभागाचे आमदार दत्तात्रय सावंत यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीने शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना करण्याची मागणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे इंदापूर तालुका अध्यक्ष विलास गाढवे, समितीचे मार्गदर्शक पद्माकर लावंड , व्याहाळी हायस्कूलचे मुख्याध्यापक व इंदापूर तालुका हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष सुधाकर भोंग, शिक्षक पतसंस्थेचे सचिव शिवाजी कुदळे , इंदापूर कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष आमीन मुल्ला, राजाभाऊ सोनमाळी, दिपक शिंदे, के .डी . भोंग, ,संजय हेंद्रे व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .










