दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड च्या ग्रामीण भागात आज २५ व्यक्तींचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे, मात्र शहरात ११ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.
ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी ही माहिती दिली. काल शुक्रवारी ( दि. ३१ ) कोरोना बाधीत व्यक्तींच्या संपर्कातील ६४ व्यक्तींची शहरातील येथील कोवीड सेंटर मध्ये कोरोनाची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६४ पैकी ११ जणांना कोरोनाची लागण झाली. ५३ जणांचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये १ ते ५७ वयोगटातील सहा महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे.











