दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथे महाशिवरात्र निमित्त ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी पहाटे पासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नागेश्वर मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
महाशिवरात्री निमित्त श्री नागेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे नागेश्वर देवाची पूजा,आरती घेण्यात आली. महाअभिषेक आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडला तसेच सायंकाळी श्री नागेश्वर देवाची पालखीतून मिरवणूक ( छबिना ) काढण्यात येणार असून यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे.
पहाटेपासूनच परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी श्री नागेश्वर मंदिरात गर्दी केली होती. रांगेत उभे राहून भाविकांनी दर्शन घेतले. सायंकाळ पर्यंतही गर्दी होती. यामध्ये लहान मुले व महिलांची संख्या जास्त होती. भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता देवस्थान विश्र्वस्थांनी घेतली होती.श्री नागेश्वर मंदीर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. वरवंड येथेही ग्रामदैवत श्री गोपीनाथ महाराज मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते