बारामती : महान्यूज लाईव्ह
मराठा आरक्षणासंदर्भात मागील भाजप सरकारने केलेल्या वकील्यांच्या नियुक्त्या संशयास्पद असल्याचे सोमेश्वनगर येथील नितीन यादव यांनी माहीती अधिकारात मागविलेल्या माहितीवरून उघड झाले आहे.
मागील सरकारने मराठा आरक्षणासाठी केलेल्या वकीलांच्या नियुक्तींबाबत बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील नितीन संजय यादव यांनी माहिती मागविली होती. मागविलेल्या माहीती अधिकारात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डिसेंबर २०१८ ते जुलै २०१९ या महिन्यांच्या कालावधीत १२ वकिलांच्या २२ नियुक्त्या करून मराठा आरक्षणासाठी वेगवेगळे वकील नेमले असल्याची धक्कादायक बाब यातुन समोर आली आहे. काही वेळा एकच वकील उच्च व सर्वोच्च न्यायालयात नियुक्त केले गेले तर काही वेळा एकाच प्रकरणात उच्च न्यायालयात वेगळे वकील तर सर्वोच्च न्यायालयात वेगळे वकील नेमल्याने आश्चर्य वाटत आहे.
सर्वोच्च न्यायालयात १० जुलै २०१९ रोजी ॲड.तुषार मेहता, मुकुल रोहोतगी, आत्माराम नाडकर्णी, परमजीतसिंग पटवालिया, व्ही.ए.थोरात, ए.वाय.साखरे, शेखर जगताप या वकीलांची नेमणुक झाली तर १७ जुलै २०१९ रोजी ॲड.वैभव सुगद्रे, ॲड.अक्षय शिंदे तर ३१ जुलै २०१९ रोजी ॲड.रोहन मिरपुरी यांच्या नियुक्त्या झाल्याचे दिसत आहे. तसेच उच्च न्यायालयात १ डिंसेबर २०१८ रोजी ॲड.व्ही.ए.थोरात, ५ जानेवारी २०१९ रोजी ॲड.हरीश साळवे, ५ जानेवारी २०१९ रोजी ॲड.अनिल साखरे, वैभव सुगद्रे, प्राची तटके, दि.१ फेब्रुवारी २०१९ रोजी ॲड.मुकुल रोहोदगी, प्रशांतसिंग पटवालीया, निशांत कटनेश्वरकर, दि.३ एप्रिल २०१९ रोजी ॲड.ए.वाय.साखरे, रोहन मिरपुरी अशा वकिलांच्या नियुक्त्या केलेल्या दिसत आहेत.
या वकीलांच्या नियुक्त्या वेळोवेळी बदलुन जाणुनबुजुन त्यांना अभ्यासाला कमी कालावधी मिळावा व मराठा आरक्षणाचे घोंगडे भिजत रहावे या उद्देशाने तर त्यांच्या नियुक्त्या बदलल्या गेल्या नाहीत ना? असा प्रश्न या माहीती अधिकारातुन मिळविलेल्या माहितीतून पडतो आहे.