मुंबई : महान्यूज लाईव्ह
पुण्यातील बैठका उरकून मुंबईत दाखल होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वांद्रे येथील ‘मातोश्री’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कोरोना सह विविध प्रश्नांबाबत बैठका घेतला. या बैठका उरकून अजितदादांनी मातोश्री बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, रात्री १२ वाजताच अजितदादांनी ट्विटर, फेसबुकवरुन उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देत महाराष्ट्रातील कोरोना संकटावर मात करून देशातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेलं राज्य बनवू असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यानंतर आता थेट त्यांनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या.
अजित पवार यांची फेसबुक पोस्ट : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितंच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे.










