बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तपासणीचे प्रमाण वाढवले आहे. मंगळवारी दिवसभरात तब्बल ६३ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी तब्बल २४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३९ जणांचे अहवाल प्रतिक्षेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
बारामतीतील कोरोना बाधितांची संख्या वाढल्यानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून शहरात गुरुवारपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर आता तपासण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभरात ६३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी २४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर उर्वरित ३९ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
आता या ३९ जणांच्या अहवालानंतर बारामतीकरांना दिलासा मिळतो की धाकधुक वाढते हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी २४ जणांच्या निगेटिव्ह अहवालामुळे प्रशासन आणि बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे.










