दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील बोरीपार्धी येथील कोरोना बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तर पाटस, मळद, यवत व इतर गावातील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील ५१ जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.
१२ जुलै रोजी दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील बोरीपार्धी, चौफुला व बिरोबावाडी येथे दिवसभरात पाचजणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने संबंधित कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या ५२ व्यक्तींचा शोध घेवुन स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यामध्ये बोरीपार्धी येथील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील एकास कोरोनाची लागण झाली आहे. तर उर्वरीत चा अहवाल पाँझिटिव्ह तर उर्वरित ५१ जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे डॉ. रासगे यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तीचे कोरोना अहवाल जरी निगेटिव्ह आले असले, तरीही नागरीकांनी खबरदारी व दक्षता घेतली पाहिजे. विनाकारण फिरणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जावू नये, तोंडाला मास्क वापरावे असे आवाहन डॉ. रासगे यांनी केले आहे.











