• Contact us
  • About us
Saturday, April 4, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता महिला, मुलींवर अत्याचार करणाऱ्याला तातडीने होईल कठोर शिक्षा ! शक्ती कायद्याचा मंजुरी !

tdadmin by tdadmin
December 24, 2021
in महिला विश्व, सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
woman swinging on swing and enjoying ride

Photo by jasmin chew on Pexels.com

महान्यूज लाईव्ह टीम

महिलांवर अत्याचार करणाऱ्याला तातडीने शिक्षा मिळावी यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती कायदा विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बलात्कार, अॅसीड हल्ले आणि समाजमाध्यमातून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र प्रसिद्ध करून बदनामी करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आलेली आहे. दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आता हे विधेयक राज्यपालांकडे पाठविले जाईल. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.

राज्यात महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा, यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती कायद्यात सुधारणा करण्यासाठी संयुक्त समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या समितीकडून अभ्यास व तज्ञांची मते जाणून घेत योग्य त्या सुधारणा करण्यात आल्या. विशेष म्हणजे या शिक्षेच्या कक्षेत पुरुषांबरोबर महिला आणि तृतियपंथी यांनाही आणले गेले आहे.

या कायद्यातील महत्वाच्या तरतूदी अशा आहेत.

बलात्कार प्रकरणात संबंधित गुन्हेगाराला मृत्यूदंड किंवा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.

गुन्हा नोंदवल्याच्या 30 दिवसांच्या आत तपास पूर्ण करावा. जर 30 दिवसात तपास करणे शक्य नसेल तर पोलीस महानिरीक्षक किंवा पोलीस आयुक्तांना 30 दिवसांपर्यंत मुदतवाढ मिळेल.

लैंगिक गुन्ह्याच्या बाबतीत न्यायालयीन चौकशी 30 दिवसात पूर्ण करण्यात येईल.

पोलीस तपासाकरिता माहिती पुरवण्यात कसूर केल्याबाबत इंटरनेट किंवा मोबाइल टेलिफोन डाटा पुरवठादार यांना तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा 25 लाख रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा देण्यात येतील.

महिलांना फोन तसेच अन्य डिजिटल माध्यमातून धमकी दिल्याप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात येईल. ही शिक्षा पुरुष, स्त्री किंवा तृतीयपंथी यांनाही देता येईल.

लैंगिक गुन्ह्यांसंदर्भात खोटी तक्रार करणे किंवा त्याद्वारे एखाद्या व्यक्तीला जाणूनबुजून त्रास दिल्यास जामीनही मिळणार नाही.

याचप्रमाणे अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराला 15 वर्षांचा कारावास किंवा आजन्म कारावासापर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच आर्थिक दंडाचीही तरतूद करण्यात येणार आहे. संबंधित पीडित महिलेला अ‍ॅसिड हल्ल्यामुळे करावा लागणारा वैद्यकीय उपचारांचा, प्लास्टिक सर्जरीचा खर्च याच दंडातून करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.

अनेकदा अशा गुन्ह्यांच्या खोट्या तक्रारी दाखल केल्या जातात. अशा प्रकरणांवरही शक्ती कायद्यात चाप लावण्यात आला आहे. खोटी तक्रार केल्यास किंवा खोटी माहिती दिल्यास तक्रारदार व्यक्तीस कमीत कमी एक वर्ष किंवा जास्तीत जास्त तीन वर्षे तुरुंगवास तसेच 1 लाख रुपयांपर्यंत एवढ्या दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. तसेच लैंगिक अपराधाबाबत खोटी तक्रार केल्यास तक्रारदारास शिक्षा होऊ शकेल, यामुळे निर्दोष मानहानीलाही आळा बसेल.

या कायद्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी सुरू झाल्यास महिलांवर अन्याय करणारांना चांगलाच चाप बसण्याची शक्यता आहे.

Next Post

खरेच आमिर खानने फातिमा सना शेखबरोबर तिसरे लग्न केले ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

December 18, 2025
तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

December 18, 2025
चौफुला येथे रेणुका कला केंद्रात लावणी वरुन राडा! पाटसच्या एकावर कोयत्याने सपासप वार!

बाप–लेकीच्या दुहेरी हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप! बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; नात्यातील ताण, लोभ आणि कटाची भयावह कहाणी उघड!

December 17, 2025
बारामती नगरपरिषद निवडणूक : प्रक्रियेत फक्त थोडा बदल; बिनविरोध झालेल्या नगरसेवकांवर परिणाम नाही! नेमका बदल काय? वाचा!

बारामतीत उद्या प्रचाराचा धुराळा.. उपमुख्यमंत्री अजित पवार, शशिकांत शिंदे, लक्ष्मण हाके उद्या बारामतीत!

December 17, 2025
सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

December 17, 2025
बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

December 17, 2025
असं का? माहित नाही..पण दौंड है की, सुधरताही नही..!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येणार? भावाच्या साताऱ्यातील रिसॉर्टवर 145 कोटींचं ड्रग्स सापडलं! साताऱ्याच्या एसपीने एकनाथ शिंदे यांच्या भावाला का वगळलं? सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप! 

December 17, 2025
बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

December 17, 2025
जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

December 17, 2025
माळेगाव साखर कारखान्याचा मागील हंगामासाठी ३४५० रुपये प्रतिटन अंतिम दर जाहीर!

हे पहिल्यांदा घडतंय.. छत्रपती कारखान्याचे कामगार आणि ऊसतोड मजूरच नव्हे; तर संचालक आणि सभासदही रात्रभर जागे आहेत! असं काय घडलंय?

December 17, 2025
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group