मुंबई : महान्यूज लाईव्ह
मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या पाठोपाठ आता अभिनेता अभिषेक बच्चन याचीही कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवरुन आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व कलाकारांनी त्यांना बरे वाटावे अशा भावना व्यक्त केल्या आहेत. त्यानंतर आता अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.










