बारामती : महान्यूज लाईव्ह
आज बारामती अक्षरशः हादरली आज बारामतीत एकाच वेळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
लासुर्णे येथील परिचारिकेच्या कुटुंबातील बारामतीचा वसंत नगर भागातील तब्बल पाच जणांना कोरोनाची लागण झाली असून, लासुर्णे येथील दुसऱ्या एका परिचारिकेच्या श्रीराम नगर येथे राहणाऱ्या पतीसही कोरोनाची लागण झाली आहे, तर गुणवडी चौकातील शाहू कॉम्प्लेक्स येथे एक, रुई येथील एक तर जळोची तील मृताच्या कुटुंबाच्या संपर्कातील एकाला कोरोनाची लागण झाली आहे.अशाप्रकारे नऊ जणांना कोरोनाची लागण झाली असली तरी, अद्यापही अनेक अहवाल अजून अपेक्षित आहेत.
आरोग्य विभाग देखील या अहवालामुळे हादरला असून, बारामतीमध्ये आता खरोखर चिंतेची बाब निर्माण झाली आहे.काल लासुर्णे येथील परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिच्या पतीसह तिच्या कुटुंबातील पाच जणांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर लासुर्णे येथे काम करणार्या जिल्हा परिषद आरोग्य केंद्रातील परिचारिकेच्या श्रीराम नगर येथील पतीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बारामतीतील परिचारिकेच्या संदर्भात परंतु इंदापुरातील आरोग्य खाते कमालीचे हादरले आहे. बारामतीतील राहणाऱ्या परंतु लासुर्णे मध्ये काम करणाऱ्या दुसऱ्याही परिचारिकेच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना ही यामुळे चिंता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसात बारामती मध्ये दररोज नव्याने रुग्ण आढळत आहेत मात्र आता आरोग्य खात्यालाच कोरोना ची लागण झाल्याने आरोग्य खात्याचे कर्मचारी व अधिकारी हादरले आहेत .
आता बारामती मध्ये खरोखरच संचारबंदी करण्याची गरज निर्माण झाली आहे आणि आता नागरिकांनीही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.










