शिरूर : महान्युज लाईव्ह
शिरूर येथील विद्याधाम प्रशालेत शिकणारी व मुळची पारनेर तालुक्यातील कोहकडी येथील सृष्टी भानुदास गायकवाड हिने राष्ट्रीय रायफल शुटिंग स्पर्धेत यश संपादन करून आंतरराष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे .
सृष्टी विद्याधाम प्रशालेत दहावी मध्ये शिकत आहे .नुकत्याच भोपाळ
( मध्यप्रदेश ) येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत ती सहभागी झाली होती . १० मीटर एअर रायफल शुटींग स्पर्धेत तिने उत्कृष्ट कामगिरी करत ५९२ .४ गुण मिळवले . तिच्या या कामगिरीमुळे ती आंतरराष्ट्रीय निवड चाचची शुटींग स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे .
ती सध्या युनिक शुटींग स्पोर्टस् क्लबमध्ये शरद तरटे ,संदीप तरटे यांच्याकडे सराव करते .
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा , वाडेगव्हाण शाळा समिती अध्यक्ष प्रकाश बोरा आणि संस्थेचे सचिव नंदकुमार निकम , प्रभारी मुख्याध्यापक योगेश जैन , भानुदास गायकवाड ,क्रीडाशिक्षक संजय शेळके यांनी सन्मान करून शुभेच्छा दिल्या .