मुंबई : महान्यूज लाईव्ह
उत्तर प्रदेशातील शिया मुस्लिम असलेल्या वसिम रिझवी यांनी आज हिंदू धर्माचा स्विकार केला. आज गाझियाबाद येथे नृसिंहानंद सरस्वती यांनी त्यांना हिंदू धर्मात सामिल करून घेतले. यावेळी बोलताना रिझवी यांनी सांगितले की, मला इस्लाममधून बाहेर काढण्यात आले आहे, दर शुक्रवारी मला ठार मारण्यासाठी वाढत्या रकमेने इनाम घोषित केले जात आहे, त्यासाठी मी आता सनातन हिंदू धर्म स्विकारत आहे.
यामध्ये धर्म परिवर्तन झाल्याचा काही मुद्दाच नाही, मुळातच मला इस्लाममधून बाहेर काढण्यात आलेले आहे, त्यामुळे मी माझ्या मर्जीने कोणत्याही धर्मात जाऊ शकतो. सनातन धर्म हा जगातला सगळ्यात पहिला धर्म आहे, त्यामुळे मी हा धर्म स्विकारल्याचे रिझवी यांनी सांगितले.
वसीम रिझवी शिया सेंन्ट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत. यापूर्वीच त्यांनी मृत्यूनंतर आपल्या शरिरावर हिंदू रितीप्रमाणे अग्नीसंस्कार करावेत अशी इच्छा व्यक्त केली होती.
आता ते हिंदू धर्मातील त्यागी समाजात सामील होतील असे नृसिंहानंद सरस्वती यांनी सांगितले.