Mahanews Market Review Team
आता फक्त फोन जवळ असणे ही काही बाब महत्त्वाची राहिली नाही. तुमच्याकडे कोणत्या ब्रँड चा फोन आहे यावर तुमची प्रतिष्ठा ठरू लागले आहे आणि म्हणूनच जगभरातील सर्वात लोकप्रिय ब्रँड असलेल्या आयफोन बाबत अनेकांना उत्सुकता असते. आयफोन चे कोणतेही मॉडेल लॉन्च झाले की, त्यावर उड्या पडतात आणि त्याला अत्यंत गरीब देशापासून, विकसनशील देशापर्यंत आणि विकसित देशापासून अती गर्भश्रीमंतापर्यंत कोणीही अपवाद नाही.
अॅपलने आता बाजारपेठेचा आढावा घेत महाग मॉडेलपेक्षा स्वस्त मॉडेल आणण्याचा विचार केला असून आता कोणीही आयफोन घेऊ शकेल अशी नवीन मॉडेलची संरचना आयफोन बाजारात आणायचे ठरवले आहे.
या नव्या मॉडेलमध्ये 5 जी कनेक्टिव्हिटी असणार आहे. त्याचबरोबर बॅटरीची क्षमता चांगली असेल. 2020 मधील आयफोन एस ई या मॉडेल सारखाच नव्या मॉडेलचा डिस्प्ले असेल. तसेच यामध्ये बायोनिक चिप असेल. 2022 मध्ये हे मॉडेल लॉन्च होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.