• Contact us
  • About us
Thursday, September 3, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौंडला कोरोना आटोक्या बाहेर, तब्बल 171 कोरानाग्रस्त. प्रशासन हतबल

Maha News Live by Maha News Live
July 4, 2020
in क्राईम डायरी, राजकीय, राज्य, लाईव्ह, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
दौंड शहरासह केडगाव,कुरकुंभमध्ये नव्याने कोरोनाचे रुग्ण.. दौंडकरांवरील कोरोनाचे संकट कायम

राजेंद्र झेंडे : महान्युज लाईव्ह
दौंड : शहरासह तालुक्यात कोरोना विषाणुचा संसर्ग झपाट्याने वाढला असून तालुक्यात तब्बल 171 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दररोज वाढत्या संख्येने आढळत असलेल्या कोरोनाग्रस्तांमुळे तालुक्यात कोरोना आता आटोक्याबाहेर चालला आहे. आरोग्य विभागासह सर्व शासकीय विभागांनी संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र कोरोना विषाणुचा संसर्गाची नुमणे तपासणी संख्या मोठी असून त्यात कोरोना पॅाझिटिव्ह रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासन ही हतबल झाले आहे.

दौंड शहरातील राज्य राखीव दलाचे जवान मुंबई येथून बंदोबस्तावरून आल्यानंतर कोरोना विषाणु संसर्गाचे जे सत्र सुरू झाले ते आजतागायत सुरूच आहे. उलट दौंड शहरातील गल्ली बोळात दिवसेंदिवस वाढू लागलेल्या कोरोनाचे लोण तालुक्यातील ग्रामीण भागात पोहचले आहे. मुंबई, पुण्यातून आलेल्या व्यक्तींमुळे या महाभयंकर कोरोनाची बाधा ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत करणारी ठरली आहे. दौंड शहरासह तालुक्यात 23 जून पर्यंत कोरोना बाधीतांचा आकडा 115 वर होता.हाच आकडा 3 जुलै पर्यंत 171 वर गेला आहे. अवघ्या 10 दिवसात 56 कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. ही वाढती आकडेवारी विचार करायला लावणारी आहे. सध्या दौंड शहरात राज्य राखीव दल, 5 व 7 तसेच इतर बटालीयनचे जवानांसह शहरात सुमारे 1505 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली यात 129 जणांना कोरोनाची लागण झाली. 89 जाणांनी कोरोना सारख्या महाभंयकर विषाणुवर यशस्वी रित्या मात करून कोरोनाला हरवले, 7 जणांचा मात्र कोरोनाने बळी घेतला. सध्या शहरात 33 जण अॅक्टीव कोरोनाग्रस्त असून त्यांच्यावर दौंड येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
तालुक्यातही दहिटणे येथे पहिला रूग्ण सापडला, त्यानंतर केडगाव, खुटबाव, बोरीपार्धी, पाटस, वरवंड, यवत, कुरकुंभ, पडवी ते अगदी व दौंडचा पूर्व भाग असलेल्या मलठणपर्यंत कोरोना पोचला. ग्रामीण भागातही कोरोना शहराप्रमाणेच झपाट्याने वाढत असल्याचे चित्र यातून निर्माण झाले. तालुक्यात 42 जणांना कोरोनाची लागण झाली, 20 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या तालुक्यात 22 अॅक्टीव कोरोना रूग्ण आहेत. त्यांच्यावर पुणे येथे शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोना संसर्गाची दौंड शहरासह तालुक्यात तब्बल 165 जणांना लागण झाली असली तरीही 109 जणांनी कोरोना ला हरवले. ही आनंददायक व दिलासा देणारी बाब आहे. 7 जणांचा कोरोनाने बळी घेतला तर एकाने कोरोनाला हरवूनही रेल्वेखाली आपला जीव देवून जीवन संपवले.
सध्या तालुक्यात कोरोना बाधीतांच्या संपर्कातील व्यक्तींच्या शोध घेता घेता आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून त्यांची तपासणी करणे, उपचार करणे, खबरदारी घेण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्यात आरोग्य खात्याचा वेळ जात आहे. अगदी जबाबदारीने व कर्तव्यनिष्ठ राहून शहरातील जिल्हा ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॅा.संग्राम डांगे, तालुका आरोग्य अधिकारी डॅा.अशोक रासगे यांच्यासह त्यांची वैद्यकीय टिम चांगले काम करीत आहे. आमदार राहूल कुल, दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील हे ही तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी समन्वय साधून रोज अपडेट घेत योग्य ती खबरदारी घेवून कोरोनाग्रस्तांनी तातडीने मदत करण्याच्या सुचना करीत आहेत. पोलीस प्रशासनही कायदासुव्यस्था जोपासत लॅाकडाऊनच्या नियमांचे पायमल्ली होणार नाही याची दक्षता घेत आहे. त्या तुलनेत सध्या काही नागरीकांचा बेजबाबदारपणा व सामाजिक भान सोडून दिल्याप्रमाणे होणारे वर्तन कोरोनाला वाढविण्यात हातभार लावत आहे. लोक आजही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. मास्क तोंडाला न घातला फिरतात, दुचाकीवर दोघे-तिघे बसवून खुलेआम प्रवास करीत आहेत. चारचाकी वाहनांमध्ये ही तशाच प्रकारचा प्रवास दिसतो. त्यातूनच दौंड तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत जाऊन परिस्थिती आटोक्याबाहेर चालली आहे.

Tags: daund corornadaund police
Next Post
दौंड शहरासह केडगाव,कुरकुंभमध्ये नव्याने कोरोनाचे रुग्ण.. दौंडकरांवरील कोरोनाचे संकट कायम

धक्कादायक: चौफुल्यावर कोरोनाबाधीत रूग्णाच्या वडीलांच्या अंत्यविधी पाटसचे ३५ जण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group