मुंबई : महान्यूज लाईव्ह
बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरेच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. परंतू तो आणि त्याचे कुटुंब ठीक आहेत.
अमरावती जिल्ह्यातील वळगावजवळ हा अपघात झाला. अमरावतीहून अचलपूरकडे जाताना वळगावच्या समोर त्याच्या कारला मागून टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली. शिव ठाकरे याची कार थेट शेतात पोचली. गाडीत असलेल्या त्याच्या आई व बहिणीला किरकोळ मार लागला आहे. मात्र गाडीचा मागील भाग चकनाचूर झाला आहे.
शिव ठाकरे हा अमरावतीचा असून बिग बॉस मराठी २ या रिअॅलिटी शोचा तो विजेता ठरला होता. त्याही पुर्वी एम टीव्ही रोडीज राइजिंग शोमध्येही तो सेमी फायनलपर्यंत पोचला होता. २०१९ मध्ये तो एम टीव्ही शो अॅन्टी सोशल नेटवर्कवर दिसला होता. सोशल मिडियाच्या माध्यमातून शिव आपल्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असतो.











