बारामती : महान्यूज लाईव्ह
अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये शुक्रवारी ( म्हणजे भारतात शनिवारी) एका रस्त्यावर अचानक नोटांचा म्हणजेच डॉलरचा पाऊस पडला. या नोटा गोळा करण्यासाठी मोठी गर्दी जमली. दोन तासाहून जास्त काळ हा रस्त्यावरील वाहतूक या कारणामुळे बंद पडली होती.
रस्त्यावरून जाणाऱ्या एका ट्रकची मागील बाजू अचानक उघडली. त्यातून नोटांनी भरलेल्या बॅंगा बाहेर फेकल्या गेल्या. अचानक बसलेल्या धक्क्याने त्या उघडल्या व त्यातील नोटा रस्त्यावर फेकल्या गेल्या. या बॅगांमध्ये १ आणि २० डॉलरच्या नोटा होत्या. रस्त्यावर या नोटांचा खच पडला होता. लोक आपपल्या कारमधून उतरून नोटा गोळा करत होते.
काही काळाने पोलिस तिथे पोचले. त्यांनी रहदारी बंद केली. त्यांनी लोकांनी घेतलेल्या नोटा परत करण्याचे आवाहन केले. त्यातील काहींनी नोटा परत केल्या तर अनेक जण नोटा घेऊन तेथून पसार झाले. नेमकी किती रक्कम नाहीशी झाली आहे, त्याचा शोध सध्या सुरु आहे.











