दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात कोरोनाचे संकट कायम असून आज तालुक्यात तीन, तर शहरात दोन असे पाच नव्याने कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे व उपजिल्हा ग्रामिण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली
काल मलठण व वरवंड येथे प्रत्येकी एक व शहरात सहा कोरोनाची लागण झालेले नव्याने रूग्ण सापडले होते, आज पुन्हा दौंड शहरासह तालुक्यातीव ग्रामीण भागात नव्याने कोरोना पाँझिटिव्ह रूग्णांचेवअहवाल प्राप्त झाले आहेत. केडगाव स्टेशन येथे एक व केडगाव येथील बावीस फटा येथे एक व कुरकुंभ येथे एक असे तीन कोरोना बाधीत रूग्ण तालुक्याच्या विविध भागात सापडले असून दौंड शहरात वास्तव्यास असलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दौंड शहरासह तालुक्यात पाच नवे कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत. तर दुसरीकडे वरवंड येथील काल सापडलेल्या कोरोना बाधीतांच्या संपर्कातील १४ जणांचे व पाटस येथील दोन जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या तालुक्यात २५ अॅक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे, तर दहा जणांनी कोरोनावर मात केली आहे. दौंड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.










