दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील कोरोना बाधित डॉक्टर दांपत्य च्या संपर्कातील काल पाठविण्यात आलेल्या १३ जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला तर वरवंड संबंधित कोरोनाबाधीत व्यक्ति च्या संपर्कातील ८ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक रासगे व आल्यानंतर वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ तुकाराम बनसोडे यांनी दिली.
वरवंड येथील रहिवासी असलेल्या व पुणे महानगरपालिकेमध्ये कर्मचारी असलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. या व्यक्तीच्या संपर्कातील कुटुंबातील व्यक्तींसह ८ जणांचा कोरोना तपासणी अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. तर पाटस येथील कोरोनाबाधीत डॉक्टर दांपत्यांच्या संपर्कातील दोन महिला कर्मचारी व एका सहायकास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने त्यांच्या संपर्कातील ३५ जणांची काल कोरोना तपासणी केली. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचा अहवाल काल प्राप्त झाला होता. त्यानंतर नव्याने १३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. याचा अहवाल आज प्राप्त झाला असून सर्व जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
दरम्यान, दौंडच्या ग्रामीण भागात खुटबाव, केडगाव, बोरीपार्धी व पाटसनंतर आता वरवंडमध्ये कोरोनाचा रूग्ण सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने पाटस आणि वरवंड येथील परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.











आपला आभारी आहे.