• Contact us
  • About us
Monday, October 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ससून रुग्णालयातील कोवीड-19 चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी 12 कोटी 44 लाखांचा निधी : उपमुख्यमंत्री अजित पवार

Maha News Live by Maha News Live
June 19, 2020
in मुंबई, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष
0
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा
  • अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा
  • उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांची गय केली जाणार नाही

पुणे : महान्यूज लाईव्ह 

कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने चाचण्यांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी 12 कोटी 44 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा,असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.       

विभागीय आयुक्त कार्यालयातील ‘झुंबर हॉल’ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त विक्रम कुमार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल विकास व सर्व्हेक्षण विभागाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह  विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.                

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोवीड-19 स्राव नमुना तपासणीसाठी लागणा-या साधनसामुग्रीसाठी 8 कोटी 90 लाख 97 हजार रुपयांचा तर यंत्रसामुग्रीसाठी 3 कोटी 53 लाख 6 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय इतर आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी 7 कोटी 15 लाख 81 हजार रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. या निधीतून कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक वैद्यकीय साधन सामुग्रीची खरेदी करता येणार आहे. याशिवाय परिसेविका व अधिपरिचारिकांच्या भरण्यात आलेल्या पदासाठी आवश्यक निधी देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.                  

कोवीड-19 चाचण्यांचे अहवाल वेळेत देण्याचे निर्देश देत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कोवीड-19 स्राव नमुने तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळासांठी आवश्यक मनुष्यबळ महापालिका प्रशासनाने तातडीने उपलब्ध करून द्यावे तसेच ससून, नायडू, यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह अन्य रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या तसेच मृत्यूसंख्येची माहिती अद्ययावत होत असल्याची खात्री प्रशासनाने करावी, तसेच कोवीड आणि इतर आजारांच्या रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांची गय केली जाणार नाही,असे स्पष्ट निर्देशही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी दिले.                 

कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे सांगून अत्यावश्यक बाबींसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून खर्च करावा, तसेच ससून रुग्णालयातील यंत्रसामुग्रीयुक्त अद्ययावत करा, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.           महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्राव नमुने तपासणी तसेच अतिदक्षता विभागातील बेड क्षमतेत वाढ करण्याची गरज असल्याचे सांगून यादृष्टीने महानगरपालिका प्रयत्नशील असल्याचे सांगितले.             डॉ. सुभाष साळुंखे यांनी गरजूंना खाटा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.  विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या सेवांचे दिवसनिहाय नियोजन करण्यात आल्याने कामात सुसूत्रता आल्याचे सांगितले.               

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुणे शहरानजीक असलेल्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले तसेच यापूर्वी रुग्ण आढळलेल्या तालुक्यातील रुग्णसंख्या कमी करण्यात यश आल्याचे सांगितले. तसेच यावेळी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड तसेच श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेच्यावतीने कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 

बैठकीत स्राव तपासणी क्षमता, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या, वैद्यकीय पार्श्वभूमी, वॉर्डनिहाय रुग्णसंख्या, कंटेन्मेंट झोन निहाय स्थिती, संस्थात्मक क्वारंटाईन क्षमता, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, ग्रामीण भागातील स्थिती तसेच उपचारसुविधा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.          यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Tags: Corona VirusDCM Ajit PawarMahavikas AaghadiPune District
Next Post

घोरपडवाडी तील महिलेस कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group