इंदापूर : महान्यूज लाईव्ह
75 व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील ग्रामदैवत श्री केतकेश्वर महादेव मंदिर येथे शंभो महादेवाच्या पिंडीला ‘तिरंगा’ ची सजावट करण्यात आली.
सध्या श्रावण मासामुळे मंदिराच्या आवारात आनंद व भक्तिमय वातावरण तयार करण्यात आले आहे.या मंदिराच्या परिसरामध्ये अतिशय सुंदर अशी सजावट व विद्युत रोषणाई मंदिरात करण्यात आली होती.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शंभू महादेवाच्या पिंडीच्या सभोवताली रंग ,रांगोळी व बेलाची पाने व रंगीत फुलांमुळे तिरंगा करण्यात आलेली पिंड सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. निमगाव केतकीचे ग्रामस्थ व कचरनाथ बाबा सेवा मंडळ यांनी मंदिरात महादेवाच्या पिंडीला व सजावट केली.