बारामती : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शऱद पवार यांनी आज तालुक्यातील कन्हेरी येथील बीजगुणन रोपवाटिकेची पाहणी केली, तसेच नियोजित शिवसृष्टीचीही पाहणी केली.
आज दुपारी चार वाजता पवार यांनी कन्हेरी येथील शासकीय बीजगुणन रोपवाटिकेची पाहणी केली. या ठिकाणी अधिकाऱ्यांनी त्यांना कामकाजाची माहिती दिल्यानंतर पवार यांनी काही आवश्यक सूचनाही केल्या. या ठिकाणी श्री. पवार यांच्या हस्ते नारळाच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले.
यानंतर पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून उभ्या राहत असलेल्या शिवसृष्टीच्या कामाचीही पाहणी केली. नियोजित शिवसृष्टी कशी असेल याविषयी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली.











