• Contact us
  • About us
Sunday, October 18, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सीधा साधा : आपला जयदादा..!

Maha News Live by Maha News Live
January 28, 2020
in व्यक्ती विशेष, Featured
0
सीधा साधा : आपला जयदादा..!

अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर बारामतीकरांनी जंगी मिरवणूक काढत त्यांचा नागरी सत्कार केला.. या मिरवणुकीसह सत्कार कार्यक्रमादरम्यान एक युवक सर्वांच्या नजरेत भरत होता.. येणाऱ्या प्रत्येकाला तितक्याच अदबीनं भेटून, एवढ्या मोठ्या राजकीय कुटुंबातून असल्याचा कोणताही अविर्भाव या तरुणाच्या चेहऱ्यावर नव्हता.. इतकंच काय तर भेटायला येणाऱ्या युवकांना स्वतः भेटून त्यांना स्वतः सेल्फी काढून देत होता.. हा तरुण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार..! प्रचंड मोठी राजकीय पार्श्वभूमी असतानाही तितक्याच अत्यंत साधेपणानं वागणारा हा तरुण प्रत्येकाला आपला वाटत होता.. त्यामुळंच प्रत्येकाच्या तोंडून एक वाक्य येत होतं ते म्हणजे सीधासाधा : आपला जयदादा..!

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी जय पवार यांनी बारामतीत काही दिवस प्रचार केला होता. जय पवार यांनी बारामती शहर आणि तालुक्यातल्या गावोगावी फिरून आपले वडील अजित पवार यांचा प्रचार केला. त्यावेळी साहजिकच अजित पवार यांचा मुलगा म्हणून युवक आणि नागरिकांमध्ये जय पवार यांच्याबद्दल आकर्षक होतं.. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण वेळ बारामतीत घालवत संपूर्ण शहर आणि तालुक्यात जय पवार हे अक्षरशः पायाला भिंगरी लावून प्रचार करताना दिसले.. इतकंच नव्हे तर त्यांच्यातला साधेपणा, प्रत्येकाशी अदबीनं वागण्याची पद्धतही लोकांना अनुभवायला मिळाली.. त्याआधी बारामतीत आलेल्या पुरानंतर जय पवार यांनी घरोघरी जाऊन पाहणी करून संबंधित कुटुंबियांना आधार देत त्यांच्यात सर्वसामान्यांविषयी असलेली आपुलकी दाखवून दिली. खरं तर राजकीय कुटुंबातल्या मुलांकडून अनेकदा अविर्भाव दाखवला जातो.. मात्र जय पवार याला अपवाद ठरले.. प्रचाराच्या निमित्तानं गावोगावी फिरताना जागा मिळेल तिथे बसून लोकांशी संवाद साधला.. सर्वसामान्यांसाठी भाजप सरकारचं धोरण कसं घातक आहे हे पटवून देतानाच लोकांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या.. त्यामुळं जय पवार यांचं वेगळेपण आपसूकच लोकांना अनुभवायला मिळालं.. एवढंच नाही तर जय पवार हे समोरच्या व्यक्तीनं सांगितलेल्या कामांबाबत तात्काळ निपटाराही करत होते..

अलीकडील काळात तरुणांचा राजकारणाकडे कल वाढतो आहे.. त्यातच जय पवार यांनीही सार्वजनिक आणि पक्षांच्या कार्यक्रमात हजेरी लावत तरुणांशी संवाद सुरु केलाय.. तरुणांना राजकारणात व्यासपीठ मिळावं यासाठी ते प्रयत्नशील आहेत… त्यामुळं राजकारणातील एक आश्वासक चेहरा म्हणून जय पवार यांच्याकडे पाहिलं जातंय.. नुकत्याच झालेल्या अजित पवार यांच्या नागरी सत्कार सोहळ्यावेळीही जय पवार यांनी उपस्थिती लावली.. या कार्यक्रमात जय पवार यांच्यातला साधेपणा प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत होता.. अनेक तरुण सेल्फीसाठी जय पवार यांच्याभोवती गराडा घालत होते.. जय पवार यांचाही या तरुणांना अगदी सहजपणे प्रतिसाद मिळत होता. त्यामुळंच की काय प्रत्येकजण एकच भावना व्यक्त करत होता ती म्हणजे सीधासाधा : आपला जयदादा..!

Tags: Ajit PawarJay PawarNCPParth PawarPolitics
Next Post
बारामतीत प्रजासत्ताक दिन उत्साहात

बारामतीत प्रजासत्ताक दिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group