बारामती : प्रजासत्ताक दिनाच्या 70 वा वर्धापनदिन बारामती येथे विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम येथील रेल्वे मैदानावर पार पडला. प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त येथील रेल्वे मैदानावर श्री. कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व संचलन पथकाचे निरीक्षण केले. पथकात शहर पोलीस पथक, होमगार्ड पथक,एनसीसी पथक, आरएसपी पथक, स्काउट गाईड, अग्निशमन दल, आरोग्य पथक, यांचा समावेश होता. यानंतर सर्व पथकांनी संचालनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. मानवंदनेच्या कार्यक्रमानंतर बारामती शहर व परिसरातील विविध शाळांनी सांस्कृतिक कार्यक्रम व विविध प्रात्याक्षिके सादर केली.
यावेळी तालुक्यातील स्वातंत्रय सैनिक, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती श्रीमती निता बारवकर, तहसिलदार विजय पाटील , उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, सा.बां.वि. उपअभियंता विश्वास ओहोळ, उपअधिक्षक भूमी अभिलेख गौरकर, पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील, पोलिस निरिक्षक आण्णा घोलप, मा. जि. जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास नाना देवकाते तसेच विविध विभागाचे शासकीय अधिकारी, स्वातंत्र्य सैनिकांचे उत्ताराधिकारी, शहरातील मान्यवर व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











