जिवीतहानी नाही, आगीत कंपनीचे मोठे नुकसान
दौंड : महान्यूज लाईव्ह
कुरकुंभ औदयोगिक वसाहतीतील कुसुम रासायनिक कंपनीला आज सकाळी अचानक आग लागली, आगीचे नेमके कारण मात्र समजु शकले नाही, मात्र जीवितहानी झाली नाही.
या आगीत कंपनीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. कुरकु़ंभ औद्योगिक वसाहतीतील अग्नीशामक दलाच्या बंबांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. बराच वेळ आग विझविण्याचे प्रयत्न ओद्योगिक वसाहतीमधील कर्मचारी करीत होते. आग मोठी असल्याने धुराने आकाशात काळे ढग जमा झाले होते. यापूर्वी काही वेळा या परिसरातील कंपन्यांना आग लागण्याचे प्रकार घडले आहे, आज कुसुम कंपनी ला लागलेल्या आगीमुळे कुरकु़ंभ व परिसरात भीतीचे वातावरण होते.
कुरकुंभ औदयोगिक वसाहतीतील कुसुम रासायनिक कंपनीला आज सकाळी अचानक आग लागली. या आगीचा व्हिडीओ (व्हिडीओ- राजेंद्र झेंडे, दौंड)
https://m.facebook.com/story.php?story_fbid=163680828508058&id=111857893690352










