प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड यांचा आदेश
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्यानंतर दौड शहरांसह बंपर क्षेत्र घोषित केले आहे, या भागात दुचाकी व चारचाकी वाहतूक करण्यास बंदी घालण्याचा आदेश दौंड पुरदंरचे उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी प्रशासनास दिले आहेत.
दौंड शहरात १६ मे रोजी पहिला कोरोना बाधीत रूग्ण सापडल्यानंतर शहराच्या तीन किलोमीटरचा परिसर प्रतिबंधक क्षेत्र व बफर क्षेत्र म्हणून दौंड-पुरंदरचे उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी घोषित केले होते. दौंड शहरातील एका चहा विक्रेता, त्याची पत्नी व नातवाला कोरोनाची बाधित झाल्याचा तपासणी अहवाल पाँझिटिव्ह आला. दौंड शहारातील कोरोना बाधीत रूग्ण शहरात वावरला असल्याचे चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यातच शहरात दुचाकी व चारचाकी वाहने परिसरात ये-जा करीत असल्याने खबरदारी म्हणून दौंड शहरासह प्रतिबंधित क्षेत्रात दुचाकी व चारचाकी वाहने वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.










