विशाल कदम:- महान्यूज लाईव्ह
पुणे : पुणे महानगरपालिका सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे लोहियानगर (पुणे) येथील मध्यवर्ती अग्निशामक केंद्राच्या जवानांनी “काळ्या फित” लावून महानगरपालिकेचा गुरुवारी (ता. २७) निषेध केला.
महानगरपालिका सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी उशीर करीत आहे. या विलंबाविरुद्ध याअगोदरच महानगरपालिकेच्या विविध संघटनांनी निषेध केला आहे. तसेच त्यांनी अनेक संघटनांनाही महानगरपालिकेविरुद्ध विरोध करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी महानगरपालिका कामगार संघटनेचे (मान्यताप्राप्त) सदस्य असलेले अग्निशामक दलाच्या जवानांनीही गुरुवारी “काळ्या फित” लावून निषेध दर्शवला..











