पुणे : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ‘डॉक्टर आपल्या दारी’ शिबीर बिबवेवाडी येथे पार पडले. या शिबिरात ९५० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हेमंत तुसे, डॉ. शशिकांत कदम, डॉ. तुषार वाघ यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी गणेश मोहिते, सुहास उभे, रोहन पायगुडे यांनी शिस्तबद्ध पद्धतीने हे अभियान राबवले.. यामध्ये औषधांचे वाटप, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, सॅनिटायझेशन आदी सर्व निकष रुग्णांद्वारे पालन करवून घेतले.
शिबिरासाठी डॉ. पी.आर.बियाणी, डॉ. मनोहर जाधव, डॉ. सिद्धार्थ जाधव यांनी बिबवेवाडी सुपर येथील कंटेन्मेंट झोनमध्ये, तसेच डॉ. मयुरा टेकवडे, डॉ. अनुपमा गायकवाड, डॉ. प्राजक्ता जाधव या महिला डॉक्टरांनी व डॉ. प्रदीप उरसळ, डॉ. सुनिल धुमाळ, डॉ. संदीप बोरकर, डॉ. सचिन ढमाले यांनी महेश सांस्कृतिक भवन अप्पर इंदिरा नगर येथे एकूण ९५० रुग्णांची तपासणी केली.. या शिबिरासाठी दोन अँबुलन्स, ४ थर्मल गन्स् , पीपीई किटस्, फेस शिल्ड उपलब्ध करण्यात आले होते.










