दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरासह तालुक्यात आज दिवसभरात विविध तपासणीत शहरात 18 व ग्रामीण भागात 18 असे एकुण 36 जण नव्याने कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
ग्रामीण भागातील पारगाव चार, यवत, गोपाळवाडी, टाकळी भिमा, भरतगाव, हिंगणीबेर्डी, खडकी, खामगाव, कुरकुंभ, लोणारवाडी, मलठण, कोरेगाव भिवर, पेडगाव स्वामी चिंचोली, नानगाव या गावात प्रत्येकी एक या असे एकूण 18 जण नव्याने कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. 28 जण आज कोरोना मुक्त झाले असून सध्या तालुक्यात 408 अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या आहे. ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांनी दिली.
शहरातील गजानन सोसायटी चार ,जनता कॅालनी तीन, बंगला साइड तीन, देवकीनगर तीन, घंटा चाळ, दत्तनगर,स्प्रिंगहोल अॅप , बोरावके नगर, हुतात्मा चौक, महाराष्ट्र बँक,नानेचाळ, या भागात प्रत्येकी एक असे एकूण 18 रुग्ण कोरोना बाधीत सापडले आहेत ही माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संग्राम डांगे यांनी दिली.










