बारामती: महान्यूज लाईव्ह
बारामतीत कोरोनाचा रुग्ण संख्येचा सिलसिला आजही कायम राहिला. काल देखील बारामती तालुक्यात एकाच कुटुंबातील अकरा जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. आपल्या निष्काळजीपणामुळे आपले संपूर्ण कुटुंब कोरोनाग्रस्त होत आहे, याची जरासुद्धा फिकीर नागरिक घेत नाहीत करत नाहीत हे दुर्दैव आहे. बारामती चा प्रवास हा कठोर निर्बंध किंवा लॉकडाऊनच्या दिशेने चालला आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
बारामतीत काल झालेल्या विविध शासकीय आरटीपीसीआर तपासण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये गोजुबावी येथील पंचवीस वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 13 वर्षीय मुलगी, 15 वर्षीय मुलगा, इंदापूर रोड येथील 36 वर्षीय पुरुष, विद्यानगरी येथील 35 वर्षीय पुरुष, कांबळेश्वर येथील 25 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 62 वर्षीय पुरुष, 41 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा, 39 वर्षीय महिला, पणदरे येथील 33 वर्षीय महिला, म्हसोबावाडी येथील 52 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 19 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरुष, नक्षत्र गार्डन येथील 47 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 38 वर्षीय पुरुष, कसबा येथील 15 वर्षीय मुलगा, तांदूळवाडी येथील 48 वर्षीय महिला, खत्री इस्टेट येथील 17 वर्षीय मुलगा, माळवाडी येथील चाळीस वर्षीय पुरुष, कॉसमॉस बँकेचे शेजारी 53 वर्षीय महिला, हरिकृपानगर येथील 32 वर्षीय पुरुष, पाणी योजना विभागाचे शेजारी 23 वर्षीय पुरुष, मोरगाव येथील 41 वर्षीय पुरुष, अंबुरे वस्ती तांदुळवाडी येथील 26 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील रुई येथे काल तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सूर्यनगरी येथील श्री 40 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आला आहे
बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये माळेगाव येथील 67 वर्षीय पुरुष, अशोक नगर येथील मंगल बंगला येथील 52 वर्षीय महिला, आनंदनगर भिगवण रोड येथील 72 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.











