बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुका दिवाळीच्या अगोदर चार रुग्णांपर्यंत पोहोचला होता. आता पुन्हा एकदा दुसऱ्या लाटेत कोरोना बारामतीकरांना धक्का देऊ लागला आहे. 20, 30, 40 कडून आता सत्तरीकडे कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे आता काळजी घेण्याची गरज आहे.
बारामती शहरातील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये काटेवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, खंडोबाची वाडी येथील 35 वर्षीय महिला, लाटे येथील 25 वर्षीय पुरुष, सोनवडी सुपे येथील 40 वर्षीय पुरुष, रुई येथील 36 वर्षीय महिला, 18 वर्षीय युवती, लोणीभापकर येथील 48 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 42 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 62 वर्षीय महिला, अशोकनगर येथील 40 वर्षीय पुरुष, अंबिकानगर येथील 65 वर्षीय महिला, अवचट इस्टेट येथील 78 वर्षीय महिला, बारामती ॲग्रो येथील 45 वर्षीय पुरुष, खत्री इस्टेट येथील 28 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 33 वर्षीय महिला, डोर्लेवाडी येथील 71 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 43 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत
बारामतीत काल झालेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये करावागज येथील 40 वर्षीय महिला, माळेगाव बुद्रुक येथील 45 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 16 वर्षीय मुलगा, 23 वर्षीय महिला, लाटे येथील 85 वर्षीय पुरुष, पणदरे येथील तीस वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 65 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
पिंपळी येथील 40 वर्षीय पुरुष, मोरगाव येथील 31 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील तीस वर्षीय पुरुष, रुई येथील 29 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 42 वर्षीय महिला, रूई येथील 24 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 75 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगी, बारामती शहरातील 40 वर्षीय महिला, सुयशनगर येथील 20 वर्षीय महिला, 18 वर्षीय युवक, 18 वर्षीय युवती यांचा समावेश आहे.
बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मुजावरवाडा माळेगाव रोड गुणवडी चौक येथील चाळीस वर्षीय पुरुष, मेडद येथील 18 वर्षीय युवक, काऱ्हाटी येथील तीस वर्षीय पुरुष, 75 वर्षीय पुरुष, मेडद येथील 18 वर्षीय युवक, काऱ्हाटी येथील तीस वर्षीय पुरुष, 75 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 61 वर्षीय महिला, काऱ्हाटी येथील 62 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये यादगार सिटी येथील 44 वर्षीय पुरुष, खाटीक गल्ली येथील 68 वर्षीय पुरुष, सराफ होंडा शोरूम पाठीमागे ग्रंथ अपार्टमेंट येथील एकाच कुटुंबातील 4 जणांचा समावेश असून यामध्ये 13 वर्षीय मुलगा, 59 वर्षीय महिला, 38 वर्षीय महिला, 67 वर्षीय पुरुष, संघवी टाऊनशिप येथील 38 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील सहा महिन्याची मुलगा, 36 वर्षीय महिला, सोमेश्वर नगर येथील 47 वर्षीय महिला, माळेगाव कॉलनी समोरील 59 वर्षीय महिला, लोहार वस्ती पवारवाडी येथील 34 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, उंडवडी सुपे येथील पाच वर्षीय मुलगा, 27 वर्षीय महिला, 52 वर्षीय महिला, शारदानगर येथील 47 वर्षीय पुरुष, ढेकळवाडी येथील 55 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.











