इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात काल 214 लोकांची रॅपिड एंटीजन व आरटीपीसीआर तपासणी झाली. यामध्ये तीस जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. दिवाळीपूर्वी 20 ते 40 जणांच्या तपासणीच्या दरम्यान आलेली संख्या आता सव्वादोनशे वर पोचली आहे याचाच अर्थ असा की कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण आता वाढू लागले आहेत.
काल इंदापूर तालुक्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सणसर येथील 77 वर्षीय पुरुष, 59 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय पुरुष, हिंगणे वाडी येथील 34 वर्षीय पुरुष, लोणी देवकर येथील 70 वर्षीय महिला, कळस येथील 75 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
कांदलगाव येथील 50 वर्षीय पुरुष, भरणेवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, काटी येथील 24 वर्षीय पुरुष, भिगवण येथील 32 वर्षीय महिला, पिलेवाडी येथील 17 वर्षीय युवक, 40 वर्षीय महिला, 50 वर्षीय महिला, भिगवण स्टेशन येथील 65 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा, नऊ वर्षीय मुलगा, डाळज नंबर 3 येथील 29 वर्षीय पुरुष, बनकरवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, निमगाव केतकी येथील 35 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
अंथुर्णे येथील 38 वर्षीय पुरुष, अकरा वर्षीय मुलगा, वरकुटे खुर्द येथील 56 वर्षीय महिला, 31 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय महिला, पळसदेव येथील 52 वर्षीय महिला, बावडा येथील 45 वर्षीय पुरुष, लोणी देवकर येथील 19 वर्षीय युवक, 24 वर्षीय पुरुष, हिंगणगाव येथील 52 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे.
कोरोना सदृश्य लक्षणावर सामान्य उपचार नको; डॉक्टरांनी गांभीर्याने घ्यावे..
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये रुग्ण वाढीचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये देखील काही रुग्ण गंभीर अवस्थेपर्यंत पोहोचत आहेत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागामध्ये डॉक्टर या रुग्णांवर सामान्य आजारांसाठी आजारांवरील उपचार करत आहेत, त्यामुळे रुग्णाची स्थिती आणखी खालावत असल्याचे मत व्यक्त केले आहे.
गेल्या काही दिवसात कोरोनाची भीती कमी झाल्याने सर्दी-खोकला व इतर लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी सामान्य विषाणूजन्य ताप या प्रमाणेच उपचार केले जात आहेत. त्यामुळे रुग्णाची स्थिती आणखी खालावून वेळेत उपचार त्यांना मिळत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील डॉक्टरांनी वेळीच रुग्णांचे समुपदेशन करून कोरोनाच्या चाचणीसाठी त्यांची मानसिकता तयार करणे व त्यांची भीती घालवून त्यांना चाचणीसाठी तयार करणे गरजेचे आहे. जेणेकरून खरोखरच कोरोनाची लागण झाली असेल तर इतर सामान्य उपचार करण्यात वेळ जाऊ नये व रुग्णाची स्थिती वेळीच व्यवस्थित व्हावी अशा हेतूने ग्रामीण भागातील डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी ठेवून दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा स्तरावरील सरकारी यंत्रणेने केले आहे.











