इंदापूर : महान्यूज लाईव्ह
भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू होत आहे, मात्र उद्या दोन वेळा गव्हाण व मोळीपूजन होणार आहे. सकाळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते तर अकरा वाजता ज्येष्ठ ऊस उत्पादक सभासदांच्या हस्ते मोळीपूजन केले जाणार आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे गव्हाणपूजन रविवारी सकाळी 11 वाजता नियोजित होते, मात्र राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना संचालक मंडळाने विनंती केल्यानंतर ते सकाळी नऊ वाजता येथे उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाल्याने संचालक मंडळाने वेळ बदलून सकाळी नऊ वाजता मोळी पूजन करण्याचे नव्याने जाहीर केले.
दुसरीकडे अगोदर ठरल्याप्रमाणे सकाळी अकरा वाजताच गव्हाण पूजन करण्याचा निर्णय सोशल मीडियावर काही ऊस उत्पादक सभासदांनी व्हायरल केला. कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनीदेखील ठरल्यानुसार सकाळी अकराचा मुहूर्त असल्याने अकरा वाजता ज्येष्ठ ऊस उत्पादक सभासद यांच्या वतीने गव्हाणपूजन होईल असे जाहीर केले. त्यामुळे उद्या कारखान्यावर दोन वेळा गव्हाण पूजन होण्याची चिन्हे आहेत.











