• Contact us
  • About us
Sunday, October 18, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माळेगावच्या निवडणूकीत छत्रपतीची उडी.. छत्रपतीच्या अध्यक्षांनी काढले माळेगावच्या कारभाराचे वाभाडे..

Maha News Live by Maha News Live
February 18, 2020
in राजकीय, राज्य, पुणे
0
माळेगावच्या निवडणूकीत छत्रपतीची उडी.. छत्रपतीच्या अध्यक्षांनी काढले माळेगावच्या कारभाराचे वाभाडे..

बारामती : माळेगावचा साखर उतारा 10.46 टक्के, तर छत्रपतीचा 10.76 टक्के आहे. छत्रपतीचे टोटल लॉसेस 1.92 टक्के तर माळेगावचे 2.25 आहे. छत्रपती कारखान्याचे युनिट 105 टक्क्यांनी सुरू आहे, माळेगावची कार्यक्षमता सध्या फक्त 92 टक्क्यांनी सुरू आहे. मग पाठीमागे कोण आहे? तुम्ही एवढा पराक्रम केलात की गेस्ट हाऊसला तुम्ही सिरप पाजलात. तरीदेखील छत्रपती कारखान्याला बदनाम करता. तुम्ही तुमचे पाप झाकण्यासाठी दुसर्‍यांवर टिका करता? अशा शब्दांत छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी माळेगावच्या कारभाराचे वाभाडे काढले.
निळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराच्या निमित्ताने काटे यांनी मळद, गुनवडी व डोर्लेवाडी या छत्रपती व माळेगाव कारखान्याचे संयुक्त कार्यक्षेत्र असलेल्या गावांमध्ये सभा घेतल्या. गेल्या काही दिवसांपासून माळेगावचे अध्यक्ष रंजन तावरे हे छत्रपती कारखान्याचे नाव घेऊन राष्ट्रवादीवर टिका करीत होते, त्या पार्श्वभूमीवर काटे यांनी पहिल्यांदाच या निवडणूकीत आपली भूमिका मांडली. यावेळी सर्व उमेदवारांसह जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, माळेगावचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
काटे म्हणाले,प्रचाराची पातळी अतिशय खालच्या स्तरावर चालली आहे. सहकार बचाव म्हणजे नेमके काय? एका सहकारी साखर कारखान्याने दुसर्‍या सहकारी साखर कारखान्यातून ऊस पळवापळवी करून सहकार बचाव होत नसतो. मला नक्की हेच कळत नाही की, छत्रपतीची निवडणूक सुरू आहे की, माळेगावची निवडणूक सुरू आहे? बहुधा माळेगावचे वास्तव समोर येऊ नये म्हणून त्या लोकांनी छत्रपतीवर घसरण्यास सुरवात केली. ज्या माळेगावच्या अध्यक्षांनी आमच्यावर टिका केली, त्यांनी हे लक्षात घ्यावे की, आमचा कधीही रस रस्त्यावर, गेस्ट हाऊसपर्यंत आला नाही. आम्ही काटकसरीनेच कारभार केला, तुम्ही कसा करता आहात हे कारखान्यांच्या पदाधिकार्‍यांना सांगायची गरज नाही. अर्थात माळेगावच्या कार्यक्षेत्रात सहकार बचाव म्हणत यांनी लोकांची दिशाभूल चालवली आहे, आमच्याकडेही छत्रपती बचाव म्हणत दररोज कामात आडकाठी आणली जाते. आता खरेतर अशा आडकाठी करणार्‍यांकडून, दररोज कोर्टकचेर्‍या करून कारखान्याच्या कामकाजात सातत्याने व्यत्यय आणणार्‍यांपासूनच वाचविण्याची गरज आहे. माळेगावच्या सभासदांनी एक लक्षात घ्यावे की, वेळ पुन्हा पुन्हा येत नाही, एकदा झालेली चूक निस्तरण्यासाठी पाच वर्षे लागतात. माळेगावमध्ये मागील पाच वर्षात यांनी फक्त आरडाओरडा केला, मालतारण कर्जाला कर्ज म्हणता येत नाही. पण बाळासाहेब तावरे यांच्या काळात कर्ज झाले अशी ओरड करीत लोकांची दिशाभूल केली. आज मात्र माळेगाववर कर्ज तर करून ठेवलेच आहे, शिवाय माळेगावचे विस्तारीकरणही कसे फसलेले आहे हे सर्वांनी पाहिलेले आहे. माळेगावच्या सहवीजनिर्मिती प्रकल्प फक्त 40 टक्के कार्यक्षमतेने चालतो. छत्रपती कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्प 52 टक्क्यांनी चालतो. अशा अकार्यक्षम लोकांनी छत्रपती कारखान्याला शिकवू नये. आमचे दोन युनिट आहेत, राज्यात अनेक कारखान्यांना यंत्रणा कमी आली. तिकडे पाऊस झाला. हा छोटा हंगाम म्हणून कामगारांनी याकडे पाठ फिरवली. कर्नाटकात एक महिना अगोदर कारखाने सुरू झाले, त्याचाही परिणाम झाला. दुसर्‍याच्या नावावर जोगवा मागू नका. छत्रपतीची चर्चा करता, मग ज्यांच्या पाठीमागे तुम्ही अगोदर फिरत होता, त्या इंदापूर तालुक्यातील इतर कारखान्यांची चर्चा का करीत नाही? सभासदांनी देखील माळेगाव आणि छत्रपती बाबत सत्य समजावून घ्यावे. सहकार बचाव म्हणणार्‍या लोकांमुळेच सहकाराचे वाटोळे झाले आहे.
भारत गावडे यांनी खांडज येथील वाघ यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले.

Tags: Ajit PawarChatrapati Sugar FactoryMalegaon Karkhana Elections NCPNilkantheshwar PanelPrashant Kate
Next Post
गुरूशिष्यांनी सभासदांची लूट केली- प्रकाश देवकाते

गुरूशिष्यांनी सभासदांची लूट केली- प्रकाश देवकाते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group