मुंबई : महान्यूज लाईव्ह
दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाचा धसका आता सगळ्यांनीच घेतला आहे. त्यातच महाराष्ट्रामध्ये बरीच पडला आहे दुष्काळ. या दुष्काळाच्या पाहणी दौऱ्यासाठी देखील सरकारी मंत्र्यांनी वेळ लावला या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर आज फडणवीस सरकारने घोषणा करताना दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अग्रीम मदत म्हणून सरकारकडून पाच हजार रुपये प्रत्येकी दिले जाणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर दुष्काळाच्या संदर्भात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आर्थिक आव्हाने उभी राहिली असल्याने दिवाळीचा सण साजरा करताना पैशाची अडचणी येऊ नये यासाठी ही आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिवाळी आधी पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे सांगतानाच दुष्काळाशी संबंधित मदतीची संपूर्ण कार्यप्रणाली दिवाळीपूर्वी पूर्ण करता येणार नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी हा आगाऊ बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.











