महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
माजी राज्यपाल अश्विनी कुमार यांनी शिमला येथील घरात आत्महत्या केली आहे.
कुमार हे पोलीस महासंचालक आणि सीबीआयचे प्रमुख राहीले आहेत. शिमलाचे एसपी मोहित चावला म्हणाले की, मणीपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांनी त्यांच्या घरी आत्महत्या केली.
आश्विनी कुमार हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक म्हणून ऑगस्ट 2006 ते जुलै 2008 पर्यंत काम करत होते. त्यानंतर त्यांची सीबीआय प्रमुख म्हणून नेमणूक झाली. आश्विनी कुमार या पदावर 2 ऑगस्ट 2008 ते 30 नोव्हेंबर 2010 या काळापर्यंत होते. त्यानंतर त्यांची मणिपुरचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. आश्विनी कुमार यांनी जुलै 2013 ते डिसेंबर 2013 या काळात हे पद सांभाळले होते.











